घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का? आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्यद्वारावर कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. बाहेरून कोहळा आणत असताना देठासहित कोहळ घरी आणावे. आणि घरी आल्यानंतर ते । स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळाच्या दोन्ही बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढावा. कोहळा बांधण्यासाठी आपण कोणतीही अमावस्या. अथवा शनिवारचा दिवस निवडावा. हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे. कोहळा बांधल्याने घराला नजर लागत नाही. कोहळा सगळी वाईट नजर स्वतःमध्ये सामावून घेत असतो.
घरात मोरपीस का ठेवतात..?
मोराच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा लांडोर मिळतो गिळतो. तेव्हा मोराची वंशवृद्धी होते. ही एक अत्यंत पवित्र गोष्ट आहे.
त्यामुळे मोराच्या पंखात प्रचंड शक्ती असते. हीच शक्ती नकारात्मक शक्तीला दूर करते.
म्हणूनच सर्व मांगल्याचे प्रतीक असलेला मोरपीस देवाच्या शिरपेचात व घरात ठेवला जातो.
मोरपिसात असलेल्या डोळ्या सारखा भाग नकारात्मक लहरींचे उच्चाटन करून बाहेर टाकण्याचे कार्य करतो.
मोरपिसाने दृष्ट काढल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून, मन शांत होते आणी अशुभ शक्तीचा त्रास होत नाही.

Comments
Post a Comment