Skip to main content

घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का?

  घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का? आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्यद्वारावर कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. बाहेरून कोहळा आणत असताना देठासहित कोहळ घरी आणावे. आणि घरी आल्यानंतर ते । स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळाच्या दोन्ही बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढावा.  कोहळा बांधण्यासाठी आपण कोणतीही अमावस्या.  अथवा शनिवारचा दिवस निवडावा. हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे. कोहळा बांधल्याने घराला नजर लागत  नाही. कोहळा सगळी वाईट नजर  स्वतःमध्ये सामावून घेत असतो.

तिरुपती बालाजी ला केस का दान करतात ?


तिरुपती बालाजी ला केस का दान करतात ?

प्राचीन कथेनुसार, बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे. अनेकदा असे घडले. एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले तो क्रोधीत झाला. जवळच पडलेली एक कुन्हाड घेतली आणि गाईवर उगारली. मात्र, बालाजी देवतेला तो घाव लागला आणि त्यावेळी काही केसही तुटले.
 
यानंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला होतो, तेथे ठेवले. नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरलाया कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केस हा शारिरीक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

 असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला. जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले.

Comments